नागपूरात मोहरमनिमित्त दर्ग्याच्या दर्शनासाठी निघालेल्या पाच जणांचा भीषण अपघातात मृत्यू

0
606

नागपूर, दि. २० (पीसीबी) – रिक्षा आणि ट्रकचा भीषण अपघात होऊन मोहरमनिमित्त चाँदशाह दर्ग्याच्या दर्शनाला निघालेल्या पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. तसेच इतर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.  

मिळालेल्या माहितीनुसार, मोहरमच्या निमित्ताने नागपूर शहरातील ताजबाग परिसरातील भाविक वरोडातील चाँदशाह दर्ग्याला ऑटोने जात होते. यावेळी कळमेश्वर-सावनेर मार्गावर सावनेरकडून कळमेश्वरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने ऑटोला धडक दिली. या धडकेत ऑटोतील पाच प्रवाशी भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर, काही प्रवासी गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच पाचही मृतांचे मृतदेह कळमेश्वर येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आले आहे.