Maharashtra

नागपुरात उमेदवार यादीवर नितीन गडकरींच्या नावापुढे ‘रिजेक्टेड’चा शिक्का

By PCB Author

April 11, 2019

नागपूर, दि. ११ (पीसीबी) –  नागपुरातील न्यू इंग्लिश स्कूलमधील मतदान केंद्रावर चक्क उमेदवार यादीवरच शिक्के मारण्यात आले  आहेत. केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे भाजप उमेदवार नितीन गडकरी यांच्या नावापुढे ‘रिजेक्टेड’ असा शिक्का मारण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

मतदारांना उमेदवारांची माहिती व्हावी, यासाठी मतदान केंद्राबाहेर उमेदवारांची यादी लावली जाते. मात्र, या यादीवर गडकरींच्या फोटो आणि नावापुढे ‘रिजेक्टेड’ असे शिक्के मारण्यात आले होते. हे शिक्के कुणी मारले , याबाबतची माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, नितीन गडकरी यांनी आज सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. मोठ्या मताधिक्याने विजयी होऊ, असा विश्वासही  त्यांनी यावेळी  व्यक्त केला. मतदानापूर्वी गडकरींनी घरी स्वतः पत्नी कांचन यांच्यासह गणपतीची पूजा केली.