Maharashtra

नागपुरातील ९६७ अनधिकृत मंदिरांना ५० हजार भरण्याचे आदेश

By PCB Author

August 02, 2018

नागपुर, दि. २ (पीसीबी) – नागपुरातील अनधिकृत मंदिरांवर सुरु असलेल्या कारवाईनंतर उच्च न्यायालयाने ९६७ मंदिरांना तूर्तास दिलासा दिला आहे. एका आठवड्यात मंदिरांना ५० हजार रुपये भरण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

नागपुरात अनधिकृत धार्मिक स्थळांवर होत असलेल्या कारवाईदरम्यान सर्वांचे लक्ष जस्टीस धर्माधिकारी आणि हक यांच्या खंडपीठाकडे लागले होते. कारवाईला आक्षेप नोंदवलेल्या ९६७ मंदिरांना एका आठवड्यात न्यायालयात ५० हजार रुपये भरायचे आहेत. मात्र रस्ते किंवा फूटपाथवर असलेल्या मंदिरांना कुठलाही दिलासा न्यायालयाने दिलेला नाही.

न्यायालयाने आधी अनधिकृत मंदिरांना दहा लाख रुपये भरण्यास सांगितले होते, मात्र वकिलांच्या युक्तिवादानंतर हा आकडा ५० हजारांवर आणण्यात आला. त्यांचे बोनाफाईड्स पाहून तोडकामाच्या कारवाईवर पुनर्विचार करायचा की नाही, हे ठरवण्यात येणार आहे. हा निर्णय महानगरपालिकेला घ्यायचा आहे.