नशाबाजांसाठी खुशखबर; आता दारु घरपोच मिळणार?

0
613

नागपूर, दि. १४ (पीसीबी) – नशाबाजांसाठी आणि त्याहूनही त्यांच्या कुटुंबीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकार आता एक असे धोरण राबवण्याच्या विचाराधीन आहे, ज्याअंतर्गत दारुची डिलिव्हरी थेट तुमच्या घरी होईल! ड्रंक अँड ड्राइव्ह केसचे प्रमाण कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्याचा सरकारचा मानस आहे. जर अशी घरपोच दारू मिळाली तर महाराष्ट्र हे दारू घरपोच देणारे देशातले पहिले राज्य असणार आहे.