नवे नेतृत्व उभे करून निवडणुकीत संघर्ष करू – शरद पवार

0
308

मुंबई, दि. २२ (पीसीबी)-  राज्यात नवे नेतृत्व निर्माण करुन निवडणुकीत संघर्ष करूच मात्र सत्तेसाठी पक्ष सोडून गेलेल्यांचाही निवडणुकीत बंदोबस्त करू, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पक्षातील पडझडीचे आव्हान स्वीकारले. ‘काळ्याआई’शी बेईमानी करणाऱ्या जातीयवादी भाजप-शिवसेनेला मतदारांनी ‘चलेजाव’ करावे, असे आवाहनही पवार यांनी नगरमध्ये बोलताना केले.

खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी नगरमध्ये पक्षाच्या मेळाव्यास विधानसभेचे माजी अध्यक्ष आ. दिलीप वळसे, आ. अरुण जगताप, आ. संग्राम जगताप, आ. राहुल जगताप, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख उपस्थित होते.

यावेळी पिचड विरोधक, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, भाजप नेते अशोक भांगरे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तर भाजपचे जिल्हा परिषद सदस्य डॉ. किरण लहामटे हे सोमवारी (दि. २३) राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

पवार म्हणाले, राज्यात काही ठिकाणी पूर आला, काही ठिकाणी दुष्काळ आहे, परंतु केंद्र व राज्य सरकारने काय मदत केली? शेतकरी आत्महत्या करत आहेत, कारखाने बंद पडत आहेत, बेरोजगारी वाढत आहे, परंतु  केंद्र व राज्य जबाबदारी झटकत आहे.  शेतकऱ्यांचे वाटोळे होत आहे, मात्र त्याकडे लक्ष न देता, जबाबदारी पेलवत नसल्याने महाजनादेश यात्रा काढून गावभर मुख्यमंत्री फिरत आहेत.