Desh

“नवे कृषी कायदे आपल्या शेतकऱ्यांना गुलाम बनवतील”

By PCB Author

September 25, 2020

नवी दिल्ली,दि.२५(पीसीबी) – आता नवे कृषी कायदे आपल्या शेतकऱ्यांना गुलाम बनवतील असं म्हणत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टिकास्त्र सोडलं आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट पोस्ट केली आहे.

“एका चुकीच्या वस्तू आणि सेवा करानं सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) संपवलं. आता नवे कृषी कायदे आपल्या शेतकऱ्यांना गुलाम बनवतील,” अशी टीका राहुल गांधी यांनी केली. राहुल गांधी यांनी ट्वीट करत सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान विविध शेतकरी संघटनांची अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, अखिल भारतीय शेतकरी संघटना, भारतीय किसान संघटना, अखिल भारतीय किसान महासंघ या देशव्यापी संघटनांनी भारत बंदची हाक दिली होती. या आंदोलनात ३० हून अधिक शेतकरी संघटना सहभागी झाल्या असून सीटू, हिंद मजदूर सभा, नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस आदी १० कामगार संघटनांनीही पाठिंबा दिला.

A flawed GST destroyed MSMEs.

The new agriculture laws will enslave our Farmers.#ISupportBharatBandh

— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 25, 2020