Chinchwad

नवी सांगवीत मध्यरात्री घरफोडी; तीन लाखांचे दागिने लांबविले

By PCB Author

November 17, 2018

चिंचवड, दि. १७ (पीसीबी) – दरवाजाचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करत तीन लाख रूपयांचे दहा तोळे सोन्या –चांदीचे दागिने लांबविले. हा प्रकार शुक्रवारी (दि. १६) मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडला.

याप्रकरणी ज्ञानेश भगवान मुळीक (वय.३० रा. क्रांती चौक, नवी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळीक हे शुक्रवारी रात्री घरी नव्हते. घराला कुलूप लावून ते बाहेरगावी गेले होते. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी मध्यरात्री दरवाजाचा कुलूप कोयंडा उचकटला. त्यानंतर घरात प्रवेश करून घरातील तीन लाख रूपये किंमतीचे दहा तोळे सोन्याचांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले.

या प्रकरणाचा सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.