नवी सांगवीत प्रेयसीचा खून करुन प्रियकराने केली आत्महत्या

0
4730

सांगवी, दि. २८ (पीसीबी) – प्रेम प्रकरणातून एका २१ वर्षीय तरुणाने १९ वर्षीय तरूणीचा वायरने गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २७) दुपारच्या सुमारास नवी सांगवीतील औंध उरो रुग्णालयाच्या कर्मचारी वसाहतीमध्ये घडली.

आदिती शामसुंदर बिडवे (वय १९, रा. बी बिल्डिंग, कर्मचारी निवास, औंध उरो रुग्णालय, नवी सांगवी) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर नेईमोदींन बिल्कोसोदीन शहा (वय २१,  रा. सिव्हिल हॉस्पिटल क्वार्टर गोदावरी बिल्डिंग लातूर) असे आदितीचा खून करुन स्वत: आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळची लातूर आंबेजोगाई येथे राहणारी आदिती काही दिवसांपूर्वीच औंध येथील तिच्या चुलत्याकडे एफवायबीएचे शिक्षण घेण्यासाठी आली होती. तीने पुण्यातील एका नामांकीत शिक्षण संस्थे अॅडमिशन देखील घेतले होते. ती आंबेजोगई येथे असताना तिचे आणि नेईमोदींन याचे प्रेमसंबंध होते. मंगळवारी दुपारीच्या सुमारास नेईमोदींन हा लातूरहून अदितीला भेटण्यासाठी तिच्या औंध येथील चुलत्याच्या घरी आला होता. त्यावेळी घरी कोणीही नव्हते. घरी कोणीही नसल्याचा फायदा घेत आरोपी नेईमोदींने वायरने गळा आवळून आदितीचा खून केला. त्या‍नंतर स्वत: देखील ओढणीच्या साह्याने सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली.

सायंकाळीच्या सुमारास आदितीचा भाऊ घरी आला. त्याने बराच वेळ दरवाजा वाजवला मात्र आतून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याने मित्रांच्या सहायाने त्याने दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता घडलेला प्रकार समोर आला. याबाबत त्याने तातडीने पोलीसांना घटनेची माहिती दिली. सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.