Chinchwad

नवी सांगवीत अल्पवयीन मुलाने साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासोबत केले अश्लील चाळे

By PCB Author

January 07, 2019

चिंचवड, दि. ७ (पीसीबी) – एका साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासोबत १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना गुरुवारी (दि.३) संध्याकाळी सहाच्या सुमारास नवी सांगवी येथे घडली.

याप्रकरणी चिमुकल्याच्या आईने त्या १३ वर्षांच्या मुलाविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास साडेतीन वर्षांचा चिमुकला हा राहत्या घरासमोर झोपाळ्यावर खेळत होता. तेव्हा तिथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलगा आला आणि तो ही त्याच्यासोबत खेळू लागला. आजूबाजूला कोणी नसल्याचे पाहून त्याने साडेतीन वर्षीय चिमुकल्यासोबत अश्लील चाळे केले. याची माहिती साडेतीन वर्षीय चिमुकल्याने घरच्यांना दिली. या नंतर कुटुंबीयांनी याबाबत सांगवी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंर त्या अल्पवयीन १३ वर्षीय आरोपीला ताब्यात घेऊन समन्स देण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक अलका सरग तपास करत आहेत.