नवी सांगवीतून मोबईल फोन पळवला

0
255

नवी सांगवी, दि. २६ (पीसीबी) – हातगाड्यावर खरेदी करत असलेल्या एका व्यक्तीचा मोबईल फोन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 25) दुपारी बारा वाजताच्या सुमारास नवी सांगवी येथील बस स्टॉप जवळ घडली.

संतोष बबन वाडेकर (वय 46, रा. नवी सांगवी) यांनी याबाबत रविवारी (दि. 25) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास फिर्यादी वाडेकर नवी सांगवी येथील पीएमपीएमएल बस स्टॉप जवळ एका हातगाडीवर नागवेलीची पाने खरेदी करत होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांचा 10 हजार रुपये किमतीचा रेडमी कंपनीचा मोबईल फोन चोरून नेला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.