नवी सांगवीतील बा. रा. घोलप महाविद्यालयात तक्रारपेटी बसविण्याची मागणी  

0
586

चिंचवड,  दि. ३ (पीसीबी) – महाविद्यालयातील महीला, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तक्रारपेठी बसविण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन चिंचवड विधानसभेतील भाजपा विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष ललित म्हसेकर यांनी आमदार लक्ष्मण जगताप व शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नवी सांगवीतील बा. रा. घोलप महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकाकडे दिले आहे.

यावेळी सुशांत रोखडे, प्रदिप जाधव, अदित्य कांबळे, अजय मारूती यांच्यासह शिक्षक व भाजपा विद्यार्थी आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.  त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, नवी सांगवीतील बारा घोलप महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच शिक्षक आणि महिलांना अनेक समस्या उद्भवतात. परंतू त्या आपल्यापर्यंत पोहचत नाहीत. त्यामुळे, त्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून त्यांच्यासाठी महाविद्यालयात तक्रारपेटी बसविण्यात यावी, जेणेकरून त्यांना उद्भवणाऱ्या समस्या आपल्यापर्यंत पोहचलीत आणि त्यावर तोडगा काढण्यास सोपे होईल, असे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.