Notifications

नवी मुंबईला शिवाजी महाराज, ठाण्याला जिजाबाई, पुण्याला संभाजी महाराज यांचे नाव द्या-अबू आझमी

By PCB Author

November 28, 2018

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – नवी मुंबईला छत्रपती शिवाजी महाराज, ठाण्याला राजमाता जिजाबाई, पुण्याला संभाजी महाराज यांचे नाव देण्याची मागणी  समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी आज (बुधवार) विधानसभेमध्ये केली. विधानसभेत बोलण्यासाठी आझमी उभे राहिले तेव्हा त्यांनी आपल्या मागणीची सुरुवात करण्याआधीच ‘शिवाजी महाराज की जय’अशी घोषणा दिली.