नवी मुंबईतील बंद दरम्यान जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

0
899

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बुधवारी (दि.२५) नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे दगडफेकीत तो जखमी झाला होता.

रोहन तोडकर (वय २१) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी मुंबईसह अनेक ठिकाणी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बंदची हाक देण्यात आली होती. मात्र मुंबई वगळता इतर ठिकाणी दुपारनंतर आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पहायला मिळाले. यावेळी कोपरखैरणेतही हिंसाचार करत दगडफेक करण्यात आली, ज्यामध्ये रोहन तोडकर जखमी झाला होता. त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. जे जे रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, पोलिसांनी कारवाई करत नवी मुंबईतील आंदोलनात हिंसा करणाऱ्या ५६ जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये काही परप्रांतीय असल्याचे समोर आले आहे.