नवाब मलिकांचा माफीनामा अण्णा हजारेंनी स्वीकारला

0
615

अहमदनगर, दि. २० (पीसीबी) – बदनामीकारक  विधानकेल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी  लेखी माफी मागितली आहे. त्यामुळे त्यांच्यावरील पुढील कारवाई थांबवण्यात येत आहे, अशी माहिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली. त्यांचा माफीनामा स्वीकारला आहे, असेही अण्णांनी सांगितले.

मलिक यांनी  हजारे यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध जोडत बदनामीकारक उल्लेख केला होता. त्यानंतर हजारे यांचे वकील अॅड. मिलिंद पवार यांच्यामार्फत २ फेब्रुवारीला मलिक यांना नोटीस बजावली होती.  त्यानंतर  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी याबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र, मलिक यांनी कोणताही खुलासा  केला नव्हता.

आपण वडीलधारी व्यक्ती आहात. आपले मन दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. आपले मन दुखावले असेल, तर दिलगिरी व्यक्त करतो,’ असे मलिक यांनी म्हटले आहे. दरम्यान, हजारे यांनी  मलिक यांचा माफीनामा आल्यानंतर  या प्रकरणातील पुढील कारवाई थांबवत असल्याचे सांगितले.