नवरा अमेरिकेहून परत येत नाही म्हणून बायकोचं आंदोलन

0
493

औरंगाबाद, दि.१५ (पीसीबी) – औरंगाबादमधील वैजापूर येथे महिलेने आपला पती अमेरिकेहून परत येत नाही म्हणून थेट आंदोलन पुकारले आहे. विशेष म्हणजे या आंदोलनात ती एकटी नसून तिचे संपूर्ण कुटुंबही आंदोलन करत आहे. सासरच्या दारातच सुरु असलेल्या या आंदोलनात घोषणाबाजी देत न्याय देण्याची मागणी होत आहे.

प्राजक्ता डहाळे असे या महिलेचं नाव आहे.

आपला पती अमेरिकेला गेला असून वारंवार विनंती करुनही परत येत नाही. म्हणूनच आपण आंदोलन करत असल्याचं ती सांगते. दरम्यान आपल्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप प्राजक्ता डहाळे यांनी केला आहे.“१३ जानेवारी रोजी आपण जे आंदोलन केले ते आपला पती अमेरिकेतून परत यावा यासाठी केले होते. उपोषानंतर सासू, दीर यांनी आपल्याला मारुन टाकण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे आपल्याला पोलीस संरक्षण द्यावे. तसंच पती लवकरात लवकर भारतात परत यावा यासाठी सहकार्य करावे,” अशी विनंती प्राजक्ता डहाळे यांनी केली आहे. हे उपोषण सध्या मागे घेण्यात आले आहे. अमेरिकेतील पतीला औरंगाबादमध्ये बोलावून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसंच पोलिसांना दोन्ही कुटुंबाशी चर्चा करुन सामंजस्याने वाद मिटवावा असा आदेश देण्यात आला आहे. १३ फेब्रुवारी रोजी मुलगा परत येईल असे सासरच्या मंडळींनी सांगितले आहे.