Desh

नवज्योतसिंह सिद्धूला वादग्रस्त विधान भोवणार; मंत्रिमंडळातून हकालपट्टी होण्याची शक्यता  

By PCB Author

February 17, 2019

अमृतसर, दि. १७ (पीसीबी) – पुलवामा येथील दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर माजी क्रिकेटर आणि पंजाबचे सांस्कृतिक मंत्री नवज्योतसिंह सिद्धू यांनी दोन्ही देशांमधील वाद चर्चेतून सोडवण्याचा सल्ला दिला होता. हा सल्ला त्यांना महागात पडण्याची शक्यता आहे. कारण त्यांची  मंत्रिमंडळातून हकालपट्टी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

त्याचबरोबर सिद्धूने मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही शहीद जवानाच्या अंत्यसंस्काराला गैरहजेरी लावली होती. त्यामुळे  सिद्धूची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी देशभरातून होत आहे. पंजाबमधील अनेक मंत्र्यांनीदेखील अशीच मागणी केली आहे.

केंद्र सरकार एकीकडे संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे सिद्धू आपल्या देशाऐवजी दहशतवादी राष्ट्राचे समर्थन करत आहे. त्यामुळे सिद्धूला पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी बाहेरचा रस्ता दाखवावा, अशी मागणी काँग्रेसच्याच मंत्र्यांनी केली आहे.