नवज्योतसिंग सिद्धू पाकिस्तानात निवडणूक लढल्यास नक्कीच जिंकतील – इम्रान खान    

0
485

नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) – काँग्रेस नेते व पंजाबचे मंत्री नवजोत सिंग सिद्धू माझ्या शपथविधीच्या कार्यक्रमाला आल्यानंतर मायदेशात त्यांच्यावर टीका झाली. ते केवळ शांतता आणि बंधुत्वाबद्दल बोलत होते. मात्र, त्यांच्यावर इतकी टीका का झाली ? हे मला समजले नाही, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. तर त्यांनी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातून निवडणूक लढवल्यास ते नक्कीच जिंकून येतील, असा विश्वास इम्रान खान यांनी यावेळी व्यक्त केला.