नवज्योतसिंग सिद्धूच्या वादग्रस्त विधानाचे स्वामी अग्निवेशकडून समर्थन

640

पुणे, दि. १७ (पीसीबी) – पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याबाबत ‘एका व्यक्तीच्या कृत्याला संपूर्ण देश जबाबदार कसा?’ असे वादग्रस्त विधान केले  होते. या विधानाचे स्वामी अग्निवेश यांनी आज (रविवार) समर्थन केली.

पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे मतदार जागृती परिषदेच्या वतीने ‘लोकसभा निवडणूक आणि देशासमोरचे आव्हान’या विषयावरील सभेचे आयोजन केले होते . त्यावेळी स्वामी बोलत होते. यावेळी डॉ.कुमार सप्तर्षी, पी.बी. सावंत, तिस्ता सेटलवाड, गिरीधर पाटील, निरंजन टकले   उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की, संपूर्ण देशाला जबाबदार धरण्यापेक्षा हा हल्ला करण्यामागे जी शक्ती आहे, त्याचे समूळ उच्चाटन करण्याची गरज  आहे, असे  मत अग्निवेश यांनी व्यकत केले आहे. या संघर्षाला धार्मिक रंग देता कामा नये. मॉब लिंचिंग हा दहशतवाद नाही का, गोहत्या विरोधात हिंसा करणाऱ्यांना मोकळे सोडले जाते, दलित आणि आदिवासींना माओवादी ठरवून तुरूंगात डांबले जाते या सर्व घटना लक्षात घेता हा दहशतवाद नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.