Desh

नरेंद्र मोदी हे विष्णूचा ११ वा अवतार आहेत – भाजप प्रवक्ते अवधूत वाघ

By PCB Author

October 12, 2018

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) – भारताचे पंतप्रधाने नरेंद्र मोदी हे विष्णूचा ११ वा अवतार आहेत, असे ट्विट भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी केले आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी या संदर्भातले ट्विट शेअर केले आहे. हिंदू संस्कृतीत ३३ कोटी देव आहेत, पंचमहाभुते आहेत, भारतमातेला आपण देव मानतो. अगदी त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी हे देशाचे प्रधानसेवक असून ते भारतमातेची सेवा ज्याप्रकारे करत आहेत त्यामुळे आमच्यासाठी ते देवासमानच आहेत, असेही वाघ यांनी म्हटले आहे.

प्रभू रामचंद्राने जन्म घेतला होता तो जगाच्या कल्याणासाठी त्याने रामराज्य आणले. कृष्णानेही देवकीच्या पोटी जन्म घेतला होता तसेच नरेंद्र मोदी हे आमच्यासाठी देवच आहेत असेही वाघ यांनी सांगितले.

सगळ्यांसाठी चांगले काम करणाऱ्या नरेंद्र मोदींना आम्ही देवच मानतो. त्यात काहीही गैर नाही असेही अवधूत वाघ यांनी म्हटले आहे. आम्हाला मोदी भक्त म्हटले जाते अंध भक्त नाही. त्यामुळे जे बोललो आहे ते माझ्या मनात मोदींबाबत जी भावना आहे त्या भावनेतूनच बोललो आहे असेही अवधूत वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.