Maharashtra

नरेंद्र मोदी सरकारवरून अनुपम खेर आणि स्वरा भास्कर एकमेकांना ऑनलाइन भिडले

By PCB Author

April 09, 2019

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना सध्या बॉलिवूडमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत. एकीकडे मोदी सरकारला पाठिंबा देणारे आणि दुसरीकडे त्यांना विरोध करणारे असे हे दोन गट आहेत. काही कलाकारांनी एकत्र येत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाला मतदान न करण्याचं आवाहन केलं होतं. यावरून ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आणि अभिनेत्री स्वरा भास्कर सोशल मीडियावर भिडले आहेत.

माझ्या क्षेत्रातील काही लोक संविधानिक प्रक्रियेतून निवडून दिलेल्या सरकारला मतदान न करण्याचं आवाहन जनतेला करत आहेत. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झाल्यास हे सर्वजण विरोधी पक्षाचा प्रचार करत आहेत. किमान इथे तरी कोणता देखावा नाही,’ असं ट्विट अनुपम खेर यांनी केलं आहे.

अनुपम खेर यांच्या या ट्विटला अभिनेत्री स्वरा भास्करने उत्तर दिलं. स्वराने ट्विटमध्ये म्हटलं की, ‘सर याला लोकशाही म्हणतात. भारत माता की जय!’ तर अभिनेत्री आलिया भट्टची आई सोनी राजदान यांनीही अनुपम खेर यांना उद्देशून ट्विट करत म्हटलं की, ‘जर तुम्ही सध्याच्या सरकारला स्वत: सोबत जोडू शकता, तर तुम्हाला काय वाटतं इतर लोक काही वेगळं करत आहेत का?’

काही दिवसांपूर्वी जवळपास ६०० सिनेनिर्मात्यांनी एकत्र येत मोदी सरकारला मतदान करू नका, असं आवाहन देशातील जनतेला केलं होतं. यानंतर मोदी सरकारला उघड पाठिंबा देणारे अभिनेते अनुपम खेर हे या सर्वांविरोधात उभे राहिले आणि हे सर्वजण विरोधी पक्षासाठी काम करत असल्याचा आरोप केला.