नरेंद्र मोदी वर्धा येथे २८ मार्चला लोकसभेच्या प्रचाराचा नारळ फोडणार

0
421

वर्धा, दि. २१ (पीसीबी) – केंद्रातील सत्ताधारी भाजप लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ महाराष्ट्रातून करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वर्धा येथे २८ मार्च रोजी जाहीर सभा होणार आहे. याच दिवसांपासून भाजपच्या अधिकृत प्रचाराला सुरूवात होईल. २०१४ मध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांनी पहिली सभा वर्धेतच घेतली होती. यंदा सुद्धा प्रचाराचा शुभारंभ वर्धा येथूनच करण्याचे भाजपने ठरवले आहे. त्यानुसार वर्धा येथील स्वावलंबी मैदानावर २८ मार्च रोजी  सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवसांपासून भाजपच्या अधिकृत प्रचाराला सुरूवात होईल.