नरेंद्र मोदी यांचे हे मराठी भाषेतील ट्विट चर्चेत

0
367

नवी दिल्ली, दि. 20 (पीसीबी) – आषाढी एकादशीनिमित्त सर्व राजकीय नेत्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सर्व नागरिकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अशातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी विठ्ठलांकडे एक प्रार्थनाही केली आहे.

आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी माझ्याकडून सर्वांना शुभेच्छा. सर्वांना उदंड आनंद आणि चांगले आरोग्य लाभू दे, अशी विठ्ठल चरणी प्रार्थना करूया, अशी प्रार्थना नरेंद्र मोदी यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाकडे केली आहे. विशेष बाब म्हणजे नरेंद्र मोदींनी चक्क मराठीतून ट्विट करत या शुभेच्छा दिल्या असल्यानं सर्वांकडून या गोष्टीचं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

 

वारकरी चळवळ ही आपल्या उत्कृष्ट परंपरेचं उदाहरण असून, समानता आणि एकता यावर भर देणारी असल्याचंही नरेंद्र मादी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच आज पहाटे पंढपूरच्या विठ्ठल- रूक्मिणीची शासकीय महापूजा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते पार पडली.

त्यावेळी पंढरपूरमध्ये पुन्हा एकदा भक्तीसागर भरू दे, भक्तीरसात टाळ,मृदुंगाच्या गजरात तुझ्या ओढीची तुझ्या ओढीची पाय वारी पुन्हा होऊ दे. कोरोना संकट लवकर नष्ट होऊ दे. माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असं साकडं उद्धव ठाकरे यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाला घातलं आहे.