Notifications

नरेंद्र मोदींविरोधात मैदानात उतरलेल्या तेलंगणाच्या २४ शेतकऱ्यांचा उमेदवारी अर्ज बाद

By PCB Author

May 03, 2019

वाराणसी, दि. ३ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात वाराणसीमधून निवडणूक लढण्यासाठी मैदानात उतरलेल्या तेलंगणाच्या २४ शेतकऱ्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने रद्द केला आहे. निवडणूक आयोगाने एका शेतकऱ्याचा अर्ज स्विकारला आहे. आयोगाने ज्या एकमेव शेतकऱ्याचा अर्ज स्विकारला आहे त्यांचे नाव इस्तारी सुन्नम नरसईया असे आहे. नरेंद्र मोदींविरोधात एकूण ११९ शेतकऱ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यामधील ८९ शेतकऱ्यांचा अर्ज आधीच रद्द करण्यात आला होता. यानंतर निजामाबादमधील ५५ आणि तामिळनाडूमधील ४० शेतकऱ्यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता, पण अखेर निजामाबादमधील २५ आणि तामिळनाडूमधील पाच शेतकऱ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. निजामाबादमधील २५ उमेदवारांपैकी २४ उमेदवारांचे अर्ज गुरुवारी रद्द करण्यात आले. वाराणसीत उपस्थित निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.