नरेंद्र मोदींचे विधान अत्यंत आक्रमक होते -डोनाल्ड ट्रम्प

0
480

न्यूयॉर्क, दि. २४ (पीसीबी) –  पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यात सोमवारी(दि.२३) न्यू-यॉर्क येथे भेट झाली. या भेटीपूर्वी ट्रम्प आणि इम्रान खान यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

एका प्रश्नाच्या उत्तरात ट्रम्प यांनी, “रविवारी ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमात ५९ हजार लोकांच्या जनसमुदायासमोर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत आक्रमक विधान केले”, असे म्हटले. ट्रम्प म्हणाले की, “भारताकडून, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून काल अत्यंत आक्रमक विधान  ऐकले…मी तिथेच उपस्थित होतो. अशाप्रकारचे विधान ऐकायला मिळेल असे मला वाटले नव्हते. तिथे उपस्थित लोकांना ते विधान आवडले पण ते अत्यंत आक्रमक विधान होते”.

नरेंद्र मोदी यांनी रविवारी ह्यूस्टनमध्ये हाउडी मोदी कार्यक्रमात पाकिस्तानवर नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला होता. “ज्यांना स्वतःचा देश सांभाळता येत नाही त्यांना(पाकिस्तानला) भारताने घेतलेल्या निर्णयांवर (काश्मीरबाबत) आक्षेप आहे. ते दहशतवाद्यांना पोसतात, दहशतवाद्यांना पाठिंबा देतात. अमेरिकेतील ९/११ हल्ला असो किंवा मुंबईतील २६/११ हल्ला, या हल्ल्यांचे षड्यंत्र रचणारे कुठे सापडले? हे लोक कोण आहेत हे फक्त तुम्हालाच नाही, संपूर्ण जगाला ठाऊक आहे”. असे मोदी म्हणाले होते.