नमो…नमो… पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सोशल मीडियावरील जलवा पाहा

0
240

नवी दिल्ली, दि. २९ (पीसीबी) : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सोशल मीडियावरील जलवा अजून कायम असल्याचं समोर आलं आहे. नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाऊंटला 7 कोटी यूजर्सने फॉलो केलं आहे. नरेंद्र मोदी हे जगातील सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या नेत्यांपैकी एक आहेत. सोशल मीडियावर त्यांची लोकप्रियता वाढत असल्याचं समोर आलं आहे. नरेंद्र मोदी यांनी 2009 मध्ये ट्विटर अकाऊंट वापरण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. 2010 मध्ये त्यांचे एक लाख फॉलोअर्स होते. तर, 2011 मध्ये त्यांच्या फॉलोअर्सची संख्या 4 लाखांपर्यंत पोहोचली होती.

विविध अभियानांसाठी वापर
नरेंद्र मोदी त्यांच्या फॉलोअर्सशी संवाद साधण्यासाठी आणि राजकीय वक्तव्यांसाठी ट्विटरचा वापर करतात. नरेंद्र मोदी यांचं फेसबुक अकाऊंट असून युट्युब चॅनेल देखील आहे. नरेंद्र मोदी सोशल मीडियाद्वारे त्यांना द्यायचा असलेला संदेश त्यांच्या फॉलओर्सपर्यंत पोहोचवतात. स्वच्छ भारत अभियान, महिला सुरक्षा, यासारख्या इतर अभियानांसाठी त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केला आहे.

कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात केंद्र सरकारनं केलेली काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नरेंद्र मोदींनी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला होता. 2018 मधील आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणानुसार नरेंद्र मोदी जगातील लोकप्रिय नेत्यांमध्ये पहिल्या तीनमध्ये होते.

बराक ओबामांचे सर्वाधिक फॉलोअर्स
मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरवर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे 129.8 मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाात फॉलोअर्स असल्यामुळे ओबामा पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा नंबर लागत होता. त्यांचे जवळपास 84 मिलियन फॉलोअर्स होते. मात्र, त्यांचे ट्विटर अकाऊंट बॅन करण्यात आले. त्यांतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे ट्विटरवर 26.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे 19.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राअध्यक्ष जो बायडेन यांचे 30.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर भारतीय वंशाच्या अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचे ट्विटरवर 18.6 मिलियन फॉलोअर्स आहेत.