Pune

नमेशशेठ बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त दिवंगत शिवाजी परदेशींच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत

By PCB Author

October 27, 2018

पुणे, दि. २७ (पीसीबी) –  नमेशशेठ बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त राजेश बांदल  यांच्या मार्गदर्शनाखाली सुर्यकांत हिंगमीरे प्रतिष्ठानच्या वतीने व माजी नगरसेविका   हिनाताई शफीक मोमीन यांच्या सौजन्याने दिवंगत शिवाजी परदेशी यांची मुलगी समृद्धी  व मुलगा देवांश  यांना रोख ११,१११ रुपये देऊन आर्थिक मदत देण्यात आली. 

आरटीओ चौकात होर्डिंगचा सांगडा कोसळून रिक्षाचालक शिवाजी परदेशी मृत्युमुखी पडले होते. त्यांच्या कुटुंबीयांना हातभार लागवा म्हणून प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अतुल सुर्यकांत हिंगमीरे, राजेंद्र दळवी,अतिकभाई मोमीन,मंगेश धोमडे,उत्कर्ष खुने पाटील, विनित वारे, अमोल चासकर आदी उपस्थित होते.

नमेशशेठ बाबर यांचा वाढदिवस केक कापून अथवा फ्लेक्स लावून साजरा न करता सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या आवाहनाला प्रतिसाद देत सुर्यकांत हिंगमीरे प्रतिष्ठानच्या वतीने स्तुत्य उपक्रम राबवून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.