Pune Gramin

“नगरसेवक शोधा, १०००रु मिळवा”

By PCB Author

September 22, 2020

वडगाव-मावळ,दि.२२(पीसीबी) – वडगाव मावळ येथील प्रभाग क्रमांक 1 च्या त्रस्त झालेल्या नागरिकांनी प्रभागातील स्थानिक नगरसेवक दशरथ केंगले विरोधात “नगरसेवक शोधा, बक्षिस मिळवा” असे निषेध फलक जागोजागी लावलेत.

प्रभागातील नागरिकांना नगरसेवक केंगले यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्याचे सांगून गायब झाले असून स्वतःचे नगरसेवकपद वाचवण्यासाठी नगरपंचायत मध्ये होणार्‍या सर्वसाधारण सभेस फक्त हजेरी लावून निघून जातात असं स्थानिकांचे म्हणणे आहे.

प्रभागातील नागरिकांचे फोन न उचलणे चुकून उचलला तर उद्धटपणे बोलणे, मी राजीनामा दिला आहे मला फोन करू नका अशी उडवाउडवीची उत्तरे नागरिकांना देत असल्याने आज प्रभाग क्रमांक 1 मधील स्थानिक रहिवाशांनी संपूर्ण प्रभागात निषेधाचे फलक लावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

दरम्यान स्थानिक नागरिकांनी नगरसेवक केंगले यांनी राजीनामा द्यावा अशी संतप्त मागणी केली असून आम्हाला प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवणारा लोकप्रतिनिधी उपलब्ध करून न्याय मिळवून द्यावा अशी विनंती केली आहे.