Chinchwad

नगरसेवक शत्रुघ्न (बापु ) काटे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे सीसी कॅमेरे

By PCB Author

January 13, 2022

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – नगरसेवक शत्रुघ्न (बापु ) काटे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे प्रभाग क्र. २८ मधील कोकणे चौकात CCTV कॅमेरे बसविण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे . त्याकरिता कोकणे चौक परिसरात स्थापत्य विषयक काम पुर्ण झाले असून येणाऱ्या काही दिवसात त्यावर CCTV कॅमेरे बसवून कार्यान्वित करण्यात येतील. प्रभागातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चौका-चौकात CCTV कॅमेरे असणे अत्यंत गरजेचे असल्याचे नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी सतत पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते.

CCTV कॅमेरे समोर होणारी प्रत्येक हालचाल रेकॉर्ड करतो आणि जेव्हा जेव्हा ती रेकॉर्डिंग आवश्यकता असते तेव्हा-तेव्हा ते उपलब्ध करता येते . आज लहान मुलांचे अपहरण, चोरी, मारामारी, बळजबरी व अत्याचार यांसारख्या घटना सर्रास घडत आहेत व त्या घटना घडण्याआधीच आळा घालण्याच्या दृष्टीने प्रभागात जागोजागी CCTV कॅमेरे बसविण्यास नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी प्राधान्य दिले आहे. याप्रकारच्या घटना घडल्यास ती CCTV कॅमेरात बंदिस्त होत असल्यामुळे गुन्हेगार व्यक्तींचा शोध घेण्यास पोलिसांना मदत होईल व यामुळे अश्या गुन्हेगारीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल तसेच येणाऱ्या काळात प्रभागातील सर्वच चौक,मुख्य रस्ते देखील लवकरात लवकर CCTV च्या देखरेखेखाली आणण्याचा उद्देश असल्याचे नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी सांगितले .

गोविंद चौक,स्वराज चौक , कुंजीर चौक,शिवार चौक,गावठाण (पेट्रोल पंप ) , पी.के.चौक,महादेव मंदिर,साई पेट्रोल पंप (काटे वस्ती ) , काटे वस्ती (नॅचरल आईस्क्रीम जवळ ),दिव्या हाईट्स सोसायटी समोर, VISION 9 मॉल समोर,चॅलेंजर स्कुल जवळ,पिंपरी -पिंपळे सौदागर पुल ,कुणाल आयकॉन (साई मंदिर चौक ) आणि रहाटणी चौक या सर्व ठिकाणी CCTV कॅमेरे बसविण्याची मागणी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी केली आहे .