नगरसेवक डब्बू आसवाणी कोरोना बाधित

317

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी उपमहापौर डब्बू आसवाणी यांच्यासह कुटुंबातील चार सदस्यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्या मुलाचा 13 जुलै रोजी विवाह आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. राजकीय वर्तुळातील आमदार महेश लांडगे यांच्यासह सात नगरसेवकांना कोरोनाची बाधा झाली. माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.

नगरसेवक डब्बू आसवाणी यांना त्रास होत होता. त्यामुळे त्यांनी घशातील द्रावाची तपासणी करुन घेतली. त्यामध्ये त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच त्यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांनाही बाधा झाली आहे. त्यांच्या मुलाचा सोमवारी (दि.13) विवाह आयोजित केला होता. परंतु, मुलालाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे विवाह सोहळा पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या वेगाने वाढते आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुन्हा दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.शहरात गुरुवार आणि रविवार नागरिकांनी स्वतःहून बंद पाळावा असे आवाहन महापौर आणि आयुक्ता यांनी केले. आज त्याला खूपच अल्प प्रतिसाद मिळाला. दुसरीकडे कोरोना उपचारासाठी रुग्णांना एकही हॉस्पिटल उपलब्ध नाही, अशी स्थिती आहे.