नऊ वर्षीय मुलाचा लैंगिक झळ केल्याने सावत्र आईवर गुन्हा

0
687

हिंजवडी, दि. २८ (पीसीबी) – नऊ वर्षीय मुलाचा लैंगिक झळ केल्याने सावत्र आईवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरुवातीला नवी मुंबईतील वाशी येथील रबेला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तो हिंजवडी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

याप्रकरणी पिडीत मुलाच्या वडिलांनीच गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०१६ ते ऑगस्ट २०१८ दरम्यान फिर्यादी यांचा नऊ वर्षीय मुलगा हा त्याच्या सावत्र आईकडे  नवी मुंबईतील वाशी येथे राहत होता. या दरम्यान आरोपी सावत्र आईने मुलाला गुंगीचे औषध देऊन जबर मारहात करत लैंगिक आणि मानसिक छळ केला, असे तक्रारीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक सपना देवताळे तपास करत आहेत.