धोनी निवृत्तीचा विचारही मनात आणू नकोस – लता मंगेशकर

0
540

मुंबई, दि, ११ (पीसीबी) – विश्वचषक सामन्यानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी निवृत्त होणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच गानसम्राज्ञी लता मंगेशकर  यांनी धोनीला निवृत्त न होण्याची विनंती केली आहे. निवृत्त होण्याचा विचारही मनात आणू नकोस, असा सल्लाही लतादीदींनी धोनीला दिला आहे. 

लता दीदींनी एक ट्विट करून धोनीला हा सल्ला देतानाच त्याची भारतीय क्रिकेटला नितांत गरज असल्याचंही म्हटले आहे. ‘धोनी तू निवृत्त होणार असल्याचे मी ऐकलंय. कृपया करून असा विचार मनात आणू नकोस. देशाला तुझ्या खेळाची गरज आहे. त्यामुळे तू निवृत्त होण्याचा विचार मनातून काढून टाक. माझीही तुला व्यक्तिगत विनंती आहे,’ असे लतादीदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे. सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला असला तरी टीम इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी लतादीदींनी प्रसिद्ध गीतकार गुलजार यांचे ‘अकाश के उस पार भी’ हे गाणे टीम इंडियाला ट्विटद्वारे समर्पित केले आहे.