Desh

धोनी क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर राजकारणात प्रवेश करेल; माजी केंद्रीय मंत्र्याचा दावा

By PCB Author

July 13, 2019

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) – टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता आहे. धोनी भाजपमध्ये प्रवेश करू शकतो, अशी चर्चा आहे. भाजपच्या एका नेत्यानंच यासंबंधी भाष्य केले आहे.

वर्ल्डकप स्पर्धेत उपांत्य फेरीत भारताचा न्यूझीलंडकडून पराभव झाला. या पराभवानंतर धोनीवर टीका होत असून, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्याची शक्यता आहे, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. धोनी निवृत्तीनंतर भाजपमध्ये प्रवेश करू शकतो, अशी शक्यता माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते संजय पासवान यांनी व्यक्त केली. धोनीच्या पक्षप्रवेशाबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. धोनीने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरच यावर निर्णय होईल, असेही पासवान यांनी सांगितले. धोनी हा जगप्रसिद्ध खेळाडू असून, त्याला पक्षात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही ते म्हणाले.