धोनीने वेळीच आपली निवृत्ती जाहीर करावी; अन्यथा संघाबाहेर बसवण्यात येईल

0
441

मुंबई, दि, १५ (पीसीबी) – विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत झालेल्या पराभवानंतर भारतीय संघात कमालीचे वाद निर्माण झाले आहेत. तर भारताचा यष्टिरक्षक आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या निवृतीच्या चर्चांनी जोर पकडला आहे. धोनीने वेळीच आपली निवृत्ती जाहीर करावी अन्यथा संघाबाहेर बसवण्यात येईल, असा इशारा बीसीसीआयने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबतचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जर, धोनीनं निवृत्ती घेतली नाही तर, त्याला आगामी मालिकेत संघात संधी मिळणार नाही. आम्ही हैराण आहोत की धोनीनं याआधी असे कधीच केलेले नाही. मात्र आता ऋषभ पंत सारखे खेळाडू धोनीची जागा घेण्यासाठी सज्ज आहे. धोनी आता आक्रमक फलंदाज राहिलेला नाही. सहाव्या आणि सातव्या क्रमांकावरही त्याला संघर्ष करावा लगतो, त्यामुळं संघाचे नुकसान होत आहे.

दरम्यान न्यूझीलंड विरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात धोनी खूपच धीम्या गतीने खेळला आहे. त्यामुळे धोनी आता फिनिशर राहिलेला नाही असे क्रिकेट तज्ञांकडून सांगितले जात आहे. न्यूझीलंड विरोधात धोनीने 72 चेंडूत 50 धावा केल्या आहेत. याआधीच्या सामन्यांमध्ये ही धोनीने खेळलेल्या चेंडूंच्या तुलनेत कमी धावा केल्या आहेत. त्यामुळे धोनीने आता निवृत्ती घोषित करावी, असे बीसीसीआयकडून सांगण्यात येत आहे.