धोनीच्या बाबातीत भावनिक न होता, व्यवहारिक निर्णय घ्या – गौतम गंभीर

0
333

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) – धोनी कर्णधार होता, तेव्हा त्यानेही भविष्याचा विचार करत युवा खेळाडूंवर विश्वास टाकला होता. आताही भविष्याला महत्त्व द्यायला हवे. धोनीच्याबाबतीत भावनिक होण्यापेक्षा व्यवहारिक निर्णय घ्यायला हवा. तरुण खेळाडूंना आतापासून संधी मिळाली नाही, तर ते परिपक्व केव्हा होणार?

धोनीने आपल्याला दोन वर्ल्डकप जिंकून दिले आहेत; पण जसे ते श्रेय फक्त त्याच्या एकट्याचे नाही, तसेच पराभवाची जबाबदारीही फक्त त्याच्या एकट्याची नाही.

नव्या दमाच्या तरुण खेळाडूंना संधी देण्याबाबत धोनी कायम आग्रही राहिला आहे. भविष्याच्या दृष्टिने त्याने तसा विचार केला. आता आपणही त्याच्याबाबत खूप भावनिक न होता, व्यवहारिक निर्णय घेत तरुण खेळाडूंना संधी द्यायला हवी, असे भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर म्हणाला. कसोटीतून धोनी आधीच निवृत्त झालेला आहे. त्यामुळे वर्ल्डकपमध्ये जी अखेरची लढत भारतीय संघ खेळला ती धोनीची अखेरची लढत होती, अशी चर्चा आहे. न्यूझीलंडविरुद्ध गमावलेली वर्ल्डकपमधील उपांत्य लढत धोनीची अखेरची वनडे लढत ठरू शकते.