“धोका पत्करुन 50 टक्के नवीन तरुण-तरुणींना संधी द्या – शरद पवार

0
349

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरात संपुर्ण महाराष्ट्राच्या काना-कोप-यातून लोक आले आहेत. इथं प्रत्येक जिल्हा, तालुका निहाय त्यांच्या संघटना तयार झाल्या आहेत. माझ्या माहितीप्रमाणे 65 ते 70 टक्के इतकी बाहेरील लोकांची संख्या आहे. त्यामुळे आपण सर्वांनी गाववाले-बाहेरवाले असं न करता, प्रत्येकाला सामावून घेतलं पाहिजे. आता सगळे बाहेरचेच आहेत. चांगल काम करणा-यांना संधी दिली पाहिजे. गरीब-श्रीमंत घरचा बघू नका, लोकामध्ये मिसळून काम करणा-या आपण सर्वांनी ताकद दिली पाहिजे. या निवडणुकीत आपण धोका पत्करुन 50 टक्के नवीन तरुण-तरुणींना संधी द्यावी, असं प्रतिपादन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. दरम्यान, शरद पवार यांच्या या धोरणाचा राष्ट्रवादी काँग्रेसला खूप मोठा फायदा होऊन शहरातील होतकरू तरुणांचा ओघ वाढेल, असे सांगण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शनिवारी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. महापालिकेत बहुतांशी म्हणजे किमान ७० टक्के नगरसेवक हे वयाची चाळीशी पार केलेले आहेत.

आजच्या पिढीला त्यांचे विचार रुचत नाहीत. नवतरुणांचा ओढा प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भाजपाकडे अधिक आहे. आयटी चा वर्ग हा आता नवमतदार असून तो राष्ट्रवादी पासून फटकून आहे. शरद पवार यांच्या युवक धोरणामुळे निर्णायकी असलेला हा मतदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजुने झुकेल असा एक अंदाज आहे