धुळ्यात तरुणाची एसटीखाली उडी घेऊन आत्महत्या

0
575

धुळे, दि. २० (पीसीबी) – धुळ्यात एका तरुणाने एसटी बसखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. ही घटना आज (गुरुवार) सकाळी पावनेदहाच्या सुमारास धुळे एसटी स्टॅन्डमध्ये घडली.

भूषण कैलास शिंपी (वय १९, रा. पारोळा, धुळे) असे मृत तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी भूषण याने सुरूवातीला एका बसखाली उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र ते शक्य झाले नाही. त्यानंतर भूषणने भुसावळ-साक्री या बसखाली उडी घेतली. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याने आत्महत्या का केली? याचे कारण स्पष्ट झालेले नाही. या घटनेनंतर बस स्थानकात खळबळ उडाली. सुरुवातीला काय घडले हे कोणाला लक्षातच आले नव्हते. सीसीटीव्हीची दृश्य पाहिल्यावर तरुणाचा अपघात न होता त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. धुळे पोलीस तपास करत आहेत.