धुळे महापालिकेत भाजपची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल

0
414

धुळे, दि. १० (पीसीबी) – धुळे महापालिकेत एकूण ७४ जागा आहेत. तर बहुमतासाठी ३८ जागांची आवश्यकता आहे. त्यानुसार सध्या येथे भाजप ३१ जागांवर आघाडीवर आहे. त्या तुलनेत दुसऱ्या क्रमांकावर आघाडी २८ जागांवर आहे. त्यामुळे भाजपला बहुमतासाठी केवळ ७ जागा कमी आहेत. त्यामुळे येथे कोण सत्ता स्थापन करणार याचे चित्र थोड्या वेळात स्पष्ट होणार आहे.

धुळे महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. तसेच भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी बंडखोरी करून लोकसंग्राम पक्षाच्या माध्यमातून उमेदवार उभे करून त्यांनी भाजपसमोर आव्हान उभे केले होते. तसेच गोटेंनी येथे शिवसेनेला छुपा पाठींबाही दिला होता. मात्र, भाजपची येथे एकहाती सत्ता मिळविण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे चित्र आहे.