धारिवाल तंत्रनिकेतनमध्ये इ-लर्निंग कार्यशाळेचे आयोजन

0
258

पिंपरी, दि.7 (पीसीबी): सध्या अचानक आलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे सगळीकडे ताळेबंदी लागू आहे, त्यामुळे मागील 3 महिन्यापासून सर्व शाळा व महाविद्यालय बंद आहेत. तरीपण आता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळा आणि महाविद्यालय हे काही दिवसात सुरू करावे लागणार आहेत परंतु विद्यार्थी शाळेत येणार नाही, त्यामुळे ऑनलाईन टिचिंगचा पर्याय वापरावा लागणार आहे. तसेच कार्यालयीन कामासाठी सुद्धा ऑनलाइनचा वापर करणे गरजेचे असेल.

या सगळ्या बाबीचा विचार करून पिंपरी चिंचवड परिसरातील शिक्षकांसाठी श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित रसिकलाल एम. धारिवाल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, चिंचवड यांनी ई- लर्निंग कार्यशाळेचे आयोजन केले आहे. हि कार्यशाळा ऑनलाइन असणार असून, यामध्ये शिक्षकांना ऑनलाईन अँपचा आणि तंत्रज्ञानाचा वापर मुलांना शिकविताना कसा करायचा ते सांगितले जाईल. सोबतच त्याचे ऑनलाइन प्रात्यक्षिक हि करून दाखवले जाणार आहेत त्यामुळे शिक्षकांना भविष्यात ऑनलाइन तंत्रज्ञानाचा वापर करणे सोपे होईल. ही कार्यशाळा दिनांक 9 आणि 10 जुलै 2020 रोजी असणार असून याचा जास्तीत जास्त शिक्षकांनी लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी तंत्रनिकेतनच्या वेबसाइट rmdiot.in ला भेट दयावी असे आव्हान तंत्रनिकेतनचे प्राचार्य अनिल थिटे यांनी केले आहे.