धायरीत १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी काकाला अटक

0
1998

पुणे, दि. ८ (पीसीबी) – काकानेच १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याचा प्रकार  उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलीच्या मावशीच्या पतीनेच हे क्रूरकृत्य केल्याचा अंदाज  पोलिसांनी व्यक्त केला आहे. सिंहगड रस्त्यावरील  धायरी येथील गारमाळ परिसरात गुरुवारी (दि. ६) ही घटना घडली होती.

नितीन दामोदर (रा.नऱ्हे) असे अटक केलेल्या आरोपीचे नांव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी संध्याकाळी अकरावीत शिकणाऱ्या १७ वर्षीय मुलीची  राहत्या घरी गळा दाबून हत्या करण्यात आली होती. शुक्रवारी  ससून रुग्णालयात  शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले होते.

पीडितेचे आई- वडील मजुरी करतात. गुरुवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे कामावर गेले. यानंतर ती घरात एकटीच होती. संध्याकाळी साडेपाचच्या  सुमारास ते कामावरुन घरी परतले असता पीडित मुलगी घरात बेशुद्धावस्थेत पडल्याचे  आढळून आले. त्यांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले असता उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे  डॉक्टरांनी सांगितले.

या प्रकरणी सिंहगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू केला आहे.