Pune

धायरीत अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ

By PCB Author

May 28, 2019

पुणे, दि. २८ (पीसीबी) – धायरीतील बरांगणे मळा येथे अर्धवट जळालेल्या अवस्थेत पुरुषाचा मृतदेह आढळ्याने एकच खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना आज (मंगळवार) दुपारी तीनच्या सुमारास समोर आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी तीनच्या सुमारास धायरी येथील बरांगणी मळा येथे अर्धवट जळालेला पुरुषाचा मृतदेह आढळल्याने परिसरातील एका इसमाने पोलिसांना माहिती दिली. त्याआधारे पोलिस घटनास्थळी पोहचून अधिक माहिती घेत आहेत. घटनास्थळी पुरुषाचे कामरेखालचा पूर्ण भाग जळालेल्या अवस्थेत होता. कमरेखालील दोन्ही पाय मृतदेहाच्या आजूबाजूला कुठेही मिळाले नसल्याचे समोर आले आहे. तसेच प्राथमिक माहितीनुसार, हा मृतदेह हा दोन ते तीन दिवसांचा असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. यामुळे अनेक तर्क वितर्क सुरू आहेत. पुढील तपास सिंहगड पोलिस करत आहेत.