धन्यवाद पिंपरी-चिंचवडकरांनो! “पीसीबी टुडे” फेसबुक पेजचे ५ लाख फॉलोअर्स; उद्योनगरीच्या सोशल मीडियात “पीसीबी”चीच धूम!

0
894

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडसह राज्य-देश-विदेशात विविध क्षेत्रांमध्ये घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या, चर्चेतल्या विषयांवरची विश्लेषणे, आकर्षक फोटो आणि व्हिडीओ वाचकांपर्यंत पोहोचवणाऱ्या “पिंपरी-चिंचवड बुलेटिन” अर्थात “पीसीबी टुडे”च्या फेसबुक पेजने सोमवारी (१० ऑगस्ट २०१८) पाच लाखांचा टप्पा ओलांडला आहे. पाच लाखांहून अधिक वाचक “पीसीबी टुडे”च्या फेसबुक पेजला फॉलो करत आहेत. तसचे २ लाख ८७ हजारहून अधिक वाचकांनी “पीसीबी टुडे” च्या फेसबुक पेजला लाइक केले आहे. वाचकांच्या उदंड प्रतिसादामुळेच अवघ्या पाच वर्षांच्या आत “पीसीबी”ला एवढी मोठी मजल मारता आली आहे. कमी वेळेत अडीच लाखांहून अधिक लाइक्सचा टप्पा ओलांडणारे “पीसीबी टुडे”हे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील मराठी बातम्यांचे एकमेव संकेतस्थळ आहे. केवळ वाचकांच्या पसंतीच्या जोरावर पिंपरी-चिंचवड आणि पुण्याच्या सोशल मीडियात “पीसीबी”चीच धूम आहे.

सध्याचे युग डिजीटल असल्यामुळे सोशल मीडियाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. जगाच्या कोनाकोपऱ्यात झटपट पोहोचण्याचा तो महामार्गच बनला आहे. या माध्यमाचा योग्य वापर करत पिंपरी-चिंचवड आणि पुण्यासह महाराष्ट्र, देश-विदेशात घडणाऱ्या बातम्या पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम “पीसीबी टुडे”गेल्या साडेचार वर्षांपासून जबाबदारीने करत आहे. www.pcbtoday.in वरून दिवसभरातील ताज्या घडामोडी नेटिझन्सना वाचायला मिळतात. त्यासोबतच बातमांच्या लिंक फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅपवर शेअरही केल्या जातात. त्याला वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून, “पीसीबी टुडे”च्या फेसबुक पेजला २ लाख ८७ हजारांहून अधिक लाइक्स आणि ५ लाखांहून अधिक फॉलोअर्स ही त्याचीच पावती आहे.

“पीसीबी टुडे”च्या फेसबुक पेजवरून एखादी महत्त्वाची बातमी किवा व्हिडीओ शेअर केल्यानंतर ती क्षणार्धात लाखो वाचकांपर्यंत पोहोचते. वाचक ती लाइक करतात, शेअर करतात आणि त्यावर आपली रोखठोक कमेंटही करतात. तसेच हटके व्हिडीओंवरही लाइक्सचा पाऊस पडतोय. साडेचार वर्षांपूर्वी सुरू झालेल्या “पीसीबी टुडे”च्या अॅपने सुरूवातीलाच मैलाचा दगड गाठला होता. ६० हजारहून अधिक स्मार्टफोन युजर्सनी “पीसीबी टुडे”चे अॅप डाऊनलोड केले आहे. त्यानंतर आता फेसबुक पेजच्या लाइक्सही वाढता वाढत वाढतच चालल्या आहेत. केवळ वाचकांच्या पसंतीमुळे “पीसीबी”ला ही मजल मारता आली आहे. वाचकांच्या या उदंड प्रेमांमुळे “पीसीबी”ची जबाबदारी आणखी वाढली आहे. वाचकांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी “पीसीबी” सदैव तत्पर असून, पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील वाचकांनो “पीसीबी” टिमकडून तुमचे शतशः आभार, तुमची अशीच साथ आम्हाला राहो.

विशेष म्हणजे “पीसीबी टुडे”च्या फेसबुक पेजचे सर्व लाइक्स “ऑरगॅनिक”असून, कुठल्याही प्रकारे “पेड प्रमोशन”न करता “पीसीबी”ने स्वबळावर ही मजल मारली आहे. पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील वाचकांच्या प्रेमाशिवाय हा पल्ला गाठणे शक्य नव्हते. हे प्रेम असेच वाढत राहू दे. फेसबुकवर टाइमपास करता करता जगाची खबरबात ठेवण्याचा, अपडेट राहण्याचा “पीसीबी”हा सोप्पा मार्ग आहे. “पीसीबी”चे फेसबुक पेज लाइक करण्यासाठी https://www.facebook.com/pcbtoday.in/ या लिंकवर या आणि लाइक बटणावर क्लिक करा आणि मिळवा लाइव्ह अपडेट्स.