Maharashtra

धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत महायुतीच्या जाहीरनाम्याची होळी

By PCB Author

December 03, 2018

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – धनगर समाजाच्या आरक्षणासाठी  महाराज यशवंतराव होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील मुलुंड येथे महायुतीच्या जाहीरनाम्याची आज (सोमवार) होळी केली. या आंदोलनाचे नेतृत्व भाजपचे खासदार विकास महात्मे यांनी केले.

धनगर समाजाच्या एस.टी आरक्षणाच्या धनगर जमातीच्या सर्व मागण्या प्रलंबित आहेत. महायुतीने २०१४ मध्ये निवडणुकीपूर्वी सत्ता आल्यावर धनगर समाजाला आरक्षण देऊ, असे आश्वासन दिले होते. अजूनही ते पूर्ण केले नाही. भाजपचा खासदार असलो, तरी आधी मी धनगर आहे, यासाठी हे आंदोलन आहे, असे खासदार महात्मे यावेळी म्हणाले.