Pune

धनकवडीत महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी वाहतूक पोलीसाला अटक

By PCB Author

August 09, 2018

पुणे, दि. ९ (पीसीबी) –  भरदिवसा महिलेचा विनयभंग करणाऱ्या पुणे शहर वाहतूक शाखेतील पोलीस हवालदाराला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना बुधवारी (दि.८) दुपारी अडीचच्या सुमारास धनकवडी येथील के.के. मार्केट बस स्टॉपवर घडली.

याप्रकरणी पिडीत ३५ वर्षीय  महिलेने  सरकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहकारनगर पोलिसांनी त्यानुसार संजय दिनकर कोंडे (वय ५०, रा़.कोयना बिल्डींग, हांडेवाडी रोड, हडपसर) या वाहतूक पोलीस हवालदारावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित ३५ वर्षीय  महिला या कसबा पोलीस चौकी बस स्टॉप ते धनकवडी असा प्रवास करून के.के. मार्केट चौकात उतरल्या. त्यावेळी बस स्टॉपवर बसलेले वाहतूक पोलीस हवालदार संजय कोंडे यांनी अचानकपणे पीडित महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून त्यांचा विनयभंग केला. ही घटना घडल्यानंतर पीडित महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि पोलीस हवालदार कोंडे यांच्याविरुद्ध फिर्याद दिली.  सहकारनगर पोलिसांनी संजय कोंडे यांना अटक केली आहे.