धनंजय मुंडेंसारख्या कर्तृत्ववान नेत्यांमुळे राष्ट्रवादीचा भोपळा झाला – पंकजा मुंडे

0
378

नागपूर, दि. १३ (पीसीबी) – धनंजय मुंडेंसारखे कर्तृत्ववान नेते राष्ट्रवादीत गेल्यामुळे राष्ट्रवादीचा भोपळा झाला, असा टोला राज्याच्या ग्रामविकास मंत्री  पंकजा मुंडे यांनी लगावला. बीड जिल्ह्यतील आष्टी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार भीमराव धोंडे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत त्या बोलत होत्या.

मुंडे म्हणाल्या की, माझी निवडणूक काही अवघड नाही. राष्ट्रवादी हे बुडणारे जहाज असून सगळ्याचा अंत जवळ आल्याने ते त्या जहाजात आहे. धनंजय मुंडे म्हणतात की, त्यांच्या भीतीने परळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा घेत आहे. पंकजा कोणाला भीत नाही, मोदी लोकसभेतील अभूतपूर्व यशानंतर शाबासकी देण्यासाठी म्हणून परळीत येत आहेत, असे त्या म्हणाल्या.

राष्ट्रवादीच्या लोकांना विकासाचे देणे-घेणे नाही. ते तर भकास गावचे राजे आहेत.  तसेच ३७० वर टीका करणारे पाकिस्तानचे आहेत का? राष्ट्रहित दिसत नसेल तर राष्ट्रवादीवाल्याचे नाव बदलले पाहिजे, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.