“धनंजय मुंडेंनी तात्काळ राजीनामा द्यावा”

0
238

मुंबई,दि.१३(पीसीबी) – लैंगिक शोषणाचा आरोप असलेले सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. भाजप नेत्यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरल्याने मुंडे यांच्यासमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे. मुंडे यांनी आपल्या चुकीच्या कृत्यामुळे तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. मुंडेंवरील लैंगिक शोषणाचे आरोप पाहता त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. भाजप महिला शाखेने एक पत्रक काढून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे आम्हीही या विषयावर आणखी जोरदार मागणी करत आहोत, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

ज्यांच्यावर अशा प्रकारचे आरोप होतात. त्यांना या पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसतो. मात्र, गेंड्याच्या कातडीचे हे मंत्री आणि महाविकास आघाडीचे सरकार याबाबत आत्मपरिक्षण करून मुंडेंचा राजीनामा घेतील असं वाटत नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान रेणू शर्मा असे या धनंजय मुंडेंविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेचे नाव आहे. रेणू शर्मा ही एक बॉलिवूड गायिका आहे. रेणू अशोक शर्मा असे तिचे संपूर्ण नाव आहे. “रेणू शर्मा यांच्या दाव्यानुसार, रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे यांची ओळख 1997 मध्ये झाली. रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे हे मध्य प्रदेशातील इंदुरमध्ये बहीण करुणा शर्मा यांच्या घरी भेटले.