Sports

धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा याला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार

By PCB Author

August 21, 2020

मुंबई, दि. २१ (पीसीबी) भारतीय क्रिकेट टीमचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा याला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि महिला क्रिकेटपटू दिप्ती शर्मा हिला अर्जून पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

रोहित प्रमाणे इतर खेळातील अनेक खेळाडूंना खेलरत्न जाहीर करण्यात आलाय. यामध्ये प्रसिद्ध महिला कुस्तीपटू विनेश फोगट, महिला टेनिसपटू मनिका बत्रा, पॅरालम्पिक खेळाडू एम. थंगवेलू त्याचप्रमाणे महिला हॉकी संघाची कर्णधार रानी रामपाल यांचा समावेश आहे. यंदाच्या वर्षी पाच खेळाडूंना खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर 27 खेळाडूंना अर्जून पुरस्कार आणि 13 प्रशिक्षकांना द्रोणाचार्य़ पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. खेलरत्न पुरस्कार पटकावणारा रोहित शर्मा चौथा क्रिकेटर आहे. यापूर्वी सचिन, धोनी आणि विराट कोहलीला हा पुरस्कार देण्यात आला आहे.

मंगळवारी राष्ट्रीय क्रिडा पुरस्कार समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत क्रीडापटूंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. यंदाच्या खेलरत्न पुरस्कारासाठी पाच खेळांडूची 3 दिवसांपूर्वी शिफारस करण्यात आली होती.