धक्का: राज्य सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणी अजित पवारांसह ५० जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

0
533

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ५० जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिले. सुरींदर अरोरा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर निर्देश देत पुढील पाच दिवसात गुन्हा दाखल करा असे म्हटले आहे.

२५ हजार कोटींच्या या घोटाळ्यामध्ये अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक बड्या नावांचा समावेश आहे.

आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांच्या कुरघोडीच्या राजकारणाचे एक केंद्र म्हणून राज्य सहकारी बँकेचा उपयोग झाला. २००१ मध्ये रिझर्व्ह बँकेने राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले. त्यानंतर चौकशीचेही आदेश दिले होते. हे सगळे प्रकरण न्यायालयात आहे, आता या प्रकरणी न्यायालयाने अजित पवारांसह एकूण पन्नास जणांविरोधात येत्या पाच दिवसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात अजित पवारांच्या अडचणीत वाढणार होण्याची शक्यता आहे.