काँग्रेसने उन्नाव आणि कठुआ बलात्कार घटनेविरोधात काढलेल्या मोर्चात कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी पहायला मिळाली. कार्यकर्त्यांच्या बेशिस्त वर्तवणुकीचा त्रास फक्त सामन्य लोकांना नाही तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनाही सहन करावा लागला. काँग्रेस कार्यकर्ते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना पाहण्यासाठी तसेच सेल्फी काढण्यासाठी गर्दी करु लागल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली होती. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना तर कार्यकर्त्यांनी धक्काबुक्कीही केली. प्रियंका गांधी तर कार्यकर्त्यांवर इतक्या संतापल्या की त्यांनी धक्का मारायचा असेल तर घरी जावा अशा शब्दांत सुनावले. ‘तुम्ही येथे कशासाठी आला आहात याचे भान ठेवा. धक्का मारायचा असेल तर घरी जावा’, असा संताप व्यक्त करताना प्रियंका गांधी दिसल्या.

काँग्रेसच्या या कँडल मार्च मोर्चामुळे इंडिया गेटजवळील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. हा मोर्चा अत्यंत अनियोजित होता हे यावरुन स्पष्ट झालं आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी वारंवार सांगूनही कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी थांबली नाही. काँग्रेसच्या या कँडल मार्च मोर्चामुळे इंडिया गेटवर निर्भया बलात्कानंतर निघालेल्या मोर्चाची अनेकांना आठवण झाली. निर्भयाचे आई-वडिलही या मोर्चात सहभागी झाले होते. काँग्रेसच्या या कँडल मार्च मोर्चामुळे इंडिया गेटजवळील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. हा मोर्चा अत्यंत अनियोजित होता हे यावरुन स्पष्ट झालं आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी वारंवार सांगूनही कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी थांबली नाही. काँग्रेसच्या या कँडल मार्च मोर्चामुळे इंडिया गेटवर निर्भया बलात्कानंतर निघालेल्या मोर्चाची अनेकांना आठवण झाली. निर्भयाचे आई-वडिलही या मोर्चात सहभागी झाले होते.