धक्कादायक : हिंजवडीत १२ वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार; एकीचा मृत्यू

0
357

चिंचवड, दि. २० (पीसीबी) – हिंजवडी पोलिस ठाणे हद्दीत दोन १२ वर्षीय अल्पवयीन मुलींवर दोघा नराधमांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे या घटनेमधील एका मुलीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.१६) दुपारच्या सुमारास हिंजवडीतील एका मंदिराच्या मागच्या बाजूस घडली होती.