Chinchwad

धक्कादायक: हिंजवडीत पुरुष जातीचे मयत अर्भक आढळल्याने खळबळ

By PCB Author

April 05, 2019

चिंचवड, दि. ५ (पीसीबी) – हिंजवडीतील हुलावळे बेद्रे वस्ती येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ पुरुष जातीचे मयत अर्भ आढळल्याने खळबळ उडाली. ही घटना गुरुवारी (दि.४) सकाळी पावणेअकराच्या सुमारा समोर आली.

याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सदाशिव निवृत्ती पवार यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी पावणेअकराच्या सुमारास हिंजवडीतील हुलावळे बेद्रे वस्ती येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ पुरुष जातीचे मयत अर्भक आढळन आले. याची माहिती स्थानिकांनी हिंजवडी पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन ते अर्भक शवविच्छेदनासाठी पाठवले. याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे अर्भक कोणी टाकले हे अद्याप समजु शकले नाही. सहाय्यक पोलीस निरीक्षक यु.आर.खाडे तपास करत आहेत.